महाराष्ट्र

तरुणाई ‘रिल्स’च्या विळख्यात; जैन मुनींना उडवलं

परभणी : रिल्स बनवणाऱ्या तरुणांच्या गाडीने पायी जाणाऱ्या जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. इन्स्टा रिल्सच्या (Instagram Reels) विळख्यात तरुणाई अडकली असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

रिल्स बनवणारे चारही तरुण अल्पवयीन असून या चारही जणांविरोधात या मुनींनी तक्रार देण्यास नकार दिला आहे. परभणीच्या बोरी येथून जिंतूरकडे जैन मुनी सौम्यसागरजी इतर मुनींसह जात होते. यावेळी बोरी तांड्याजवळ दोन दुचाकीवर चार युवक रिल्स बनवत असताना त्यांच्या गाडीने सौम्यसागरजी यांच्यासह त्यांचा सेवेकरी संकेत मोहारे यांना जोराची धडक दिली ज्यामध्ये दोघे ही गंभीर जखमी झाले. यावेळी भक्तांनी तात्काळ मदतीसाठी वाहन आणले. मात्र वाहनात बसण्यास जैन मुनींनी नम्रपणे नकार दिला. स्ट्रेचरवर सौम्यसागर मुनी यांना जिंतूरला नेण्यात आले.  सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यासह सेवेकरी संकेत मोहारे यांची प्रकृती स्थिर आहे.

इंटरनेटवर असंख्य तरुणांमध्ये इन्स्टा रिल्सची (Insta Reels) खूप क्रेझ आहे. अनेक तरुण-तरुणी दिवसभर इन्स्टा रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 

Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये