पत्रकार निखिल वागळे यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार करण्याची गरज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर
पुणे : पुणे शहरातील दांडेकर पुल जवळ असलेल्या साने गुरुजी स्मारक येथे निर्भय सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे.या सभेला पत्रकार निखिल वागळे हा मूर्ख माणूस उपस्थित राहणार आहे.काही काळापूर्वी निखिल वागळे यांना पत्रकार म्हणून एक स्थान होते.पण ते स्थान स्वतः च्या हातून घालविले आहे.भाजपचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी भारतरत्न जाहीर केला. त्यानंतर निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले.त्या विधानाचा मी निषेध व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली आहे.
दीपक मानकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी या दोन्ही महान नेत्यांच देश उभारणीत मोठ योगदान आहे.हे देशातील सर्व जनतेच्या लक्षात आहे.प्रत्येक जण त्यांच्या कार्याच कौतुक करित आहे तसेच पुणे शहरात काही कालावधीपूर्वी निखिल वागळे यांनी दारू पिऊन जे कृत्य केले होते आणि त्यानंतर पुणे शहरामधून कसे गेले होते.हे सर्वाना माहीती आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या बद्दल निखिल वागळे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त करतो.
आम्ही निखिल वागळे यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही. त्याच बरोबर मागील काही वर्षातील निखिल वागळे यांची विधान पाहिल्यावर त्यांच मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आता निखिल वागळे यांची येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे.त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर तरी ते चांगली भाषा वापरतील एवढच वाटत असल्याच सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी निखिल वागळे यांचा निषेध नोंदविला.