‘मिस्टर पुणे २०२५’ चा मानकरी ठरला कमलेश आचरा..

‘मिस्टर पुणे’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न
पुणे: फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे आयोजित व पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि पिंपरी चिंचवड बॉडीबिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने व मुख्य प्रायोजक ट्रू व्हिजन ( Trrue vision ) पुरस्कृत पुण्याची मानाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी मिस्टर पुणे ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा गणेश कलाक्रिडा रंगमंच येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत मिस्टर पुणेचा मानकरी कमलेश आचरा ठरला तर ७० किलो वजन गटाखालील स्पर्धेचे विजेतेपद नरेंद्र वाल्हेकर याने सलग दोनवेळा पटकविण्याचा मान मिळविला. उपविजेता अतुल म्हात्रे तर मेन्स फिजिकचा विजेता रोहन गोगावले व वूमन बॉडीबिल्डिंग ची विजेती यशोदा भोर ठरली.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षीची स्पर्धा खेळाडू व प्रेक्षकांचे आकर्षण ठरली . फेडरेशनने बॉडी बिल्डिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यातील नावाजलेल्या बॉडीबिल्डरचे नाव स्पर्धेतील प्रत्येक गटाला देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धकांना फेडरेशनच्या वतीने 3 लाख 50 हजार रुपयाचे धनादेश देत मानचिन्ह प्रशस्तीपत्रका बरोबरच पैलवान बाळासाहेब राऊत यांच्याकडून दोन्ही विजेत्यांना गदा देण्यात आली तर बॉडीबिल्डिंग मध्ये पहिल्यांदाच विजेत्याला परदेशात ( व्हियेतनाम) जाण्याची संधी ट्रॅव्हलमेटचे संचालक श्री शैलेश कान्नव यांच्यावतीने देण्यात आली. डीएचएफ चे संचालक निलेश साठे यांच्या वतीने हॉटेल हिलटॉन क्लबची मेंबर शिप व संदीप वाडेकर यांच्या हॉटेल ऑरा सेलेस्टियाच्या वतीने सर्व खेळाडू व प्रेक्षकांना फ्री गिफ्ट कूपन देण्यात आले.



स्पर्धेच्या निमित्ताने मानाची ट्रॉफी प्रथम दगडूशेठ हलवाई गणपती चरणी ठेऊन आशीर्वाद घेण्यात आले. त्याप्रसंगी सर्व बॉडीबिल्डर यांनी पोजिंगच्या माध्यमातुन गणपती बाप्पास मानवंदना दिली तसेच मंदिरात ट्रॉफीचे अनावरण मंडळाचे अध्यक्ष श्री रासने व खजिनदार महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ट्रूव्हिजनचे संस्थापक कुणाल खेडेकर ,राजेश सावंत , संदीप वाडेकर ,शैलेश कान्नव , सचिव दिलीप धुमाळ अध्यक्ष नंदू कळमकर , सुहास नांगरे मयुर मेहेर व सर्व पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते .



या स्पर्धेत आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला देण्यात येणारे मानाच्या ट्रॉफीची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण , शिववछत्रपती पुरस्कार सन्मानित अजिंक्य रेडकर व राजेश ईरले, २०२४ चा मिस्टर पुणे विजेता संदेश नलावडे राष्ट्रीय खेळाडू मल्लेश धनगर हे सहभागी झाले होते. दरवर्षी फेडरेशनच्या कार्यात उत्तम काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला बेस्ट ऑफिशियल अवॉर्ड देण्यात येतो याचे मानकरी मोहसीन शेख ठरले .



फेडरेशनच्या वतीने श्री कुणाल खेडेकर यांची चिएफपॅट्रोन पदी निवड करण्यात आली व ट्रूहिजन ( Trrue vision ) चे संस्थापक , प्रसिध्द मोटीवेशनल ट्रेनर डॉ.विजय नायडू यांना याप्रसंगी विशेष सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ डॉ. विजय नायडू , माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ , माजी नगरसेवक अविनाश बागवे व धंनजय जाधव , कुणाल खेडेकर यांच्या हस्ते झाला .
दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून उत्तम नियोजन व खेळाडूंना योग्य न्याय देत स्पर्धा यशस्वी केली या स्पर्धेत पंच म्हणून राजेंद्र नांगरे, मयूर मेहेर, अनिल कांबळे, सागर येवले, गौतम तांबे यांनी काम पाहिले स्टेज मार्शल मोहसीन शेख व नितीन खैरनार तर बॅकस्टेज मार्शल अनिकेत गायकवाड , संकेत पाटिल नितीन क्षीरसागर ,आविष्कार भवर, अजय पतंगे , सुरेश शेगार यांनी काम पाहिले तसेच टेक्निशन म्हणून दत्ता भगत, नेहा मॅडम, महेश गायकवाड, विवेक काकडे , सुमित राऊत , हर्षल यांनी काम पाहिले सूत्रसंचलन साहिल धुमाळ व महेश सोनी यांनी केले .



या स्पर्धेस सर्वश्री उमेश जरग, अमर शिवरकर ,तुषार चिवटे, गिरीश जैन ,सुमित राऊत, सचिन लगड, ट्रू व्हिजनचे सर्व झोनल मॅनेजर यांचे विशेष सहकार्य लाभले. संघटनेचे सचिव दिलीप धुमाळ हे दरवर्षी नवनवीन संकल्पनेच्या माध्यमातून मिस्टर पुणे स्पर्धेचे नियोजन करीत स्पर्धेला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतात.