पुणे शहर

“कोथरूड मध्ये राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या सुचनेनुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतीच कर्वेनगर येथील रत्ना हॉटेल येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोठ्या उत्साहात अभियानाचे संपूर्ण नियोजन करून सदस्य नोंदणी अभियानाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील फादर बॉडीचे पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी म्हणून आढावा घेत माहिती घेण्यात आली.  

Img 20250310 wa02324095435649637866308

सदर प्रसंगी कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर, महिला अध्यक्ष तेजल दुधाने, कोथरूड निरीक्षक माणिक दुधाने, विद्यार्थी शहराध्यक्ष शुभम माताळे, वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष विजय बाबर, शहर सरचिटणीस धनंजय पायगुडे,  फादर बॉडी शहर उपाध्यक्ष आनंद बंडू तांबे, संतोष बराटे,कुमार बराटे,प्रशांत निम्हण,रजनी पाचंगे, संजय चव्हाण,संघटक सचिव ओमकार निम्हण, महिला शहर कार्याध्यक्ष संगीता बराटे,विधानसभा सरचिटणीस महिला दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष अपूर्वा तांबे,कांता खिलारे,विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,युवक उपाध्यक्ष,सुरज गायकवाड,सागर चंदनशिवे कोथरूड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर, कोथरूड सरचिटणीस नवनाथ खिलारे, सामाजिक न्याय अध्यक्ष अमित तुरुकमारे, कर्वेनगर प्रभाग अध्यक्ष प्रतिक नलावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये