राहुल गांधींवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वारजेत जोरदार निदर्शने..

खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन
वारजे : केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने वारजे हायवे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील, मिलिंद पोकळे, श्रीकृष्ण बराटे, विजय लगड, अवधूत मते, लहू अण्णा निवंगुणे, सचिन बराटे, शिवदास काळभोर, तुषार जवळकर, अतुल कारले, राजाभाऊ कुंभार, दत्ता झंजे, प्रभाकरजी भोरकडे, मारुती मोहिते ,माऊली बराटे ,धनंजय पोकळे चंद्रकांत बराटे आदी उपस्थित होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्र सरकारची ही कारवाई म्हणजे सुडबुध्दीची असून लोकशाहीला मारक आहे. राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये ते देशातील प्रत्येक घरात पोहचले आहे. त्याचीच भीती वाटू लागल्याने ही कारवाई करण्यात आल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.




