स्व. विनायक मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी तळजाई टेकडी येथे शिवसंग्रामच्या वतीने वृक्षारोपण

पुणे : लोकनेते स्व. विनायक मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त तळजाई टेकडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या ज्योती विनायक मेटे, शिवसंग्रामचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे हे उपस्थित होते. या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, साहेबांना जाऊन एक वर्ष झाले. आपण सर्वजण या विपरीत परिस्थितीत ठामपणे एक राहिलो. आता संघटना वाढीसाठी लक्ष देणे हे आपले कर्तव्य आहे. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळाची असून कुठला पक्ष नेमका काय करतोय हे कळत नाही. कार्यकर्ते जिथे स्वार्थ साधला जाईल तिथे जातात. निष्ठावान कार्यकर्ते कमी झाले आहेत. या परिस्थितीत आपल्याला संघटनेचे काम पुढे न्यायचे आहे. आज याचा शुभारंभ पुण्यातून होत आहे ही चांगली गोष्ट आहे.
ज्योती मेटे म्हणाल्या, मेटेसाहेब जाऊन एक वर्ष झाले. सर्व कार्यकर्ते या परिस्थितीत ही पक्षासोबत ठामपणे उभे आहेत . तसेच स्व. मेटेसाहेब यांचे स्वप्न व पक्षाची धोरणे राबविण्यास प्रयत्नशील आहेत हे पाहून स्व. विनायक मेटे यांची मी पत्नी आहे याचा मला अभिमान वाटतो.
स्व. विनायकराव मेटेसाहेब यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मराठा व बहुजन समाजाचे प्रश सोडविण्यासाठी खर्च केले. अपघात झाला त्यावेळीही ते राज्य सरकार आयोजित महत्वाच्या बैठकीसाठी मुंबईला जात होते. अश्या या आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे विचार व शिवसंग्रामचे धोरण पुढे नेण्यासाठी पुण्यातील सर्व शिवसंग्राम सैनिक यावेळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम प्रदेश सचिव शेखर पवार यांनी आयोजित केला होता. या प्रसंगी शिवसंग्राम पुणे शहर अध्यक्ष भरत लगड, शहर महिला अध्यक्ष कलिंदि गोडांबे, शहर सरचिटणीस सचिन दरेकर , समीर निकम, श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, रितेश पवार, हनुमंत पवार, रवींद्र भोसले, दीपक जोशी,अविनाश सणस, चेतन भालेकर, संतोष वरक, अमित शिंदे, सागर फाटक, दिपक माझीरे, भरत फाटक, नथुराम थेराडे, राजेश महामुलकर, आदी उपस्थित होते. चैतन्य पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.






