पुणे शहर

संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी..

कोथरूड : महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड मतदार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड, ऋषेकेश शिंदे, तेजस बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30

गिरीश गुरनानी म्हणाले, संपूर्ण भारत देशाचे गौरव असलेले महात्मा गांधीजी ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला,अशा या महापुरुषाबाबत बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी आताच नव्हे तर असे बऱ्याचदा महपुरुषांबाबत, महिलांबाबत बेताल वक्तव्य करून देशात अशांती निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेले बेताल वक्तव्य हे भारत देशाचा अपमान आहे. या अपमानास्पद वक्तव्याबाबत संभाजी भिडे यांच्यावर कलम ५०४,५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे गुरनानी यांनी सांगितले.

Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये