कोथरुड
कोथरूड विकास मंचातर्फे विधवा महिलांना धान्य वाटप तसेच झाड दत्तक योजनेतून रोपे वाटप कार्यक्रम संपन्न

पुणे : कोथरूड विकास मंचातर्फे योगेश राजापूरकर, कांचन कुंबरे,अश्विनी भालेकर यांच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त राबविलेल्या सेवाकार्य निमित्त गरजू विधवा महिलांना धान्य वाटप व पर्यावरण दिनानिमित्त “झाड दत्तक” योजने अंतर्गत रोपे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,महिला मोर्चा शहराध्यक्ष अर्चना पाटील,कोथरुड पोलीस निरीक्षक वृषाली पाटील,ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीराम बेडकिहाळ,पल्लवी शिवकुमारश्री. तसेच या कार्यक्रमास विशेष सहकार्य करणारे बाळू दांडेकर ,प्रदिप जोरी . कार्यक्रमास सागर कडू, विलास मोहोळ, रुपेश भोसले ,अमित बंडागले हे उपस्थित होते.




