कोथरुड

टपाल सप्ताहाचे औचित्य साधत लक्ष्मी दुधाने यांनी नागरीकांना मागितला पत्राद्वारे विकास कामांचा फिडबॅक..

कर्वेनगर : ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तर दि. ९ ऑक्टोबर ते दि. १४ ऑक्टोबर हा टपाल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. याच टपाल सप्ताहाचे औचित्य साधून नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. दुधाने यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांबाबत नागरिकांच्या भावना व प्रलंबित कामाबाबत सूचना टपालाद्वारे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
              

गेल्या कित्येक शतकांपासून आपल्या सेवेत असणाऱ्या टपाल खात्याच्या इतक्या वर्षांच्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही हा टपाल सप्ताह साजरा करण्याचे ठरवले असून  टपाल खात्याच्या विशाल वृक्षाला मानाचा मुजरा करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असणार असल्याचे नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी सांगितले.
              

नागरिकांनी केलेल्या विकास कामांबाबत पाठवलेल्या भावनांचा व प्रलंबित कामांच्या सूचनांचे स्वागत असेल. आमचा हा उपक्रम आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मदत करेल व आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास होऊन उज्ज्वल स्वप्नातील कर्वेनगर- वारजे सत्यात उतरायला वेळ लागणार नाही असे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने म्हंटले आहे.

केवळ केलेल्या विकास कामांबाबत नागरिकांना त्यांच्या भावना पत्राद्वारे मागवतानाच प्रलंबित कामांच्या सूचनाही मागवल्याने दुधाने यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना बऱ्याच वर्षांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. आता किती नागरिक पत्राद्वारे आपल्या भावना व विकास कामांबाबत सूचना पाठवणार हे पाहावे लागणार आहे.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये