महाराष्ट्र
लालपरी गुरुवारपासून रस्त्यावर धावणार
लालपरी गुरुवारपासून रस्त्यावर धावणार
मुंबई : कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्याची लालपरी असलेल्या एसटीची आंतरराज्य व राज्य अंतर्गत सेवा बंद होती.त्यापैकी आंतरजिल्हा बस सेवा गुरुवारपासून 20 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे .
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.गुरुवारपासून एसटीची साधी निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत.त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
एसटीच्या प्रवासासाठी इ पासची आवश्यकता नाही.
मात्र प्रवासादरम्यान प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या covid-19 त्याच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. दि. 23 मार्च पासून कोरोना महामारी मुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद होती.
………….




