राष्ट्रीय

भारतरत्न लता मंगेशकर कालवश; एका युगाचा अस्त

मुंबई : जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. गेल्या 28 दिवसांपासून त्या ब्रीच कँडी इस्पितळात उपचार घेत होत्या.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

करोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने त्यांना तातडीने इस्पितळात हलवण्यात आले होते. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद देणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली आहे.

नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये