कोथरुडपुणे शहर

पुण्यातील क्वारंटाईन घरांमधील कचरा उचलण्याच्या सोयीविषयी हे जाणून घ्या

पुणे : पुण्यामधील कोरोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे.  बहुसंख्य लोकांना होम क्वारंटाइन केले जाते.  अशा वेळी त्यांच्या घरातील कचरा वेगळा गोळा करून तो जाळून टाकण्याची व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे.  पुण्याच्या प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र गाडी त्यावर स्वच्छता सेवकांचा एक संघ कार्यरत आहे. 

होम क्वारंटाइन घरामधील लोकांनी आपला ओला व कोरडा कचरा स्वतंत्र ठेऊन तो पिशव्यांमध्ये पॅक करून त्यावर सॅनिटायझर मारून दोन दिवसातून एकदा येणाऱ्या  या वेगळ्या गाडीच्या सेवकांसाठी ते कचरा गोळा करायला येतील तेंव्हा दाराबाहेर ठेवावा.  ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
    
महापालिकेच्या या योजनेची माहिती न पोचल्याने अनेक ठिकाणी या होम क्वारंटाइन घरांमधील कचराही सोसायटीच्या इतर कच-यात मिसळून टाकला जातो जे अत्यंत घातक असून त्यातून कोरोना प्रसाराचा धोका वाढत आहे.  दुर्दैवाने महापालिकेची ही गाडी व टीमही अनेक ठिकाणी 8-10 दिवस येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.   ‎होम क्वारंटाइन असलेल्या घरातील लोकांनी यासंबंधी सजग राहून महापालिकेच्या स्थानिक  क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला पाहिजे.

याबाबतीत बोलताना माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे म्हणाले, होम क्वारंटाइन असलेल्या घरातील कचरा उचलण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना याची योग्य माहिती नसल्याने अडचण होत आहे. तरी याबाबतीत नागरिकांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क करायला हवा.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये