तर चांदणी चौकातील अपघात टळला असता…

पुणे : चांदणी चौकामध्ये सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बहुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी चांदणी चौकातून कोथरूड कडे जाताना असलेला तीव्र उतारावर सर्वाधिक अपघात होतात. हा तीव्र उतार तसाच राहिला आणि त्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे.
याबाबतीत तातडीने उपाययोजना करण्याची गरज असताना बहुमजली चकाचक पूल दाखवत नॅशनल हायवे अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहेत. याठिकाणी वेळीच उपाययोजना
करण्यात आली असती तर कदाचित आज चा अपघात टळला असता. यापुढील काळात तरी या तातडीने तीव्र उतार कमी करण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
याबाबतीत चांदणी चौक लोहिया जैन आयटी पार्क आज भीषण अपघात झाला आहे . अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी तेथील नागरिकांचे मागणी नुसार तेथे अपघात होऊ नये यासाठीच दि.11/6/2024 वारजे येथील नॅशनल हायवेचे ऑफीस मधे नॅशनल हायवे,काॅन्टॅक्टर पुणे मनपा प्रशासन अधिकारी,पोलीस ट्राफिक विभाग कोथरूड अधिकारी,यांचे बरोबर मिटींग घेतली आहे. आणि याठिकाणी चांदणी चौकातून कोथरूड ला जाणारा संपूर्ण रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्यात यावा. अशी मागणी केली होती.
दिलीप वेडे पाटील म्हणाले, चांदणी चौकातून कोथरूड कडे येणारा तीव्र उतार कमी करावा जेणेकरून अशा प्रकारचे अपघात थांबविता येईल. यासाठी मी दोन दिवसांपूर्वी नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा विषय मांडला होता. यापूर्वी देखील याबाबतीत मागणी केली होती. मात्र प्रशासनाच्या वतीने अद्याप कामास सुरुवात करण्यात आली नाही. आजच्या अपघाताच्या घटनेतून तरी प्रशासनाचे डोळे उघडावे आणि या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

























