चांदणी चौकात भीषण अपघात ; कोथरूडकडे येणाऱ्या उतारावर एसटीची महाकार्गो आणि..
चांदणी चौकात उड्डाणपूल होऊनही अपघाताचे सत्र थांबेना
कोथरूड : चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या उतारावरती आज पुन्हा भीषण अपघात घडला आहे. एसटी महामंडळाची महाकार्गो मालवाहतूक करणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
४ मे रोजी याच ठिकाणी पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला होता. पीएमपीएल बसणे अनेक वाहनांना उडवले होते. या अपघातात बस खाली सापडलेल्या एका व्यक्तीला नागरिकांनी बाहेर काढले होते. तसाच अपघात आज पुन्हा लोहिया जैन आयटी पार्क समोर घडला आहे.
एसटीची महाकार्गो मालवाहतूक करणारी गाडी उतारावरून खाली येत असताना हा अपघात घडला आहे . महाकार्गो गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. ब्रेक फेल झाल्याने एसटीच्या महाकार्गो गाडीने आपला ट्रक बदलला आणि ती समोरून येणाऱ्यांची वाहनांच्या बाजूला गेली. काही कळायच्या आतच रेडी मिक्सर ट्रक व दुचाकीला धडक दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात कविता साठे (रा. भुगाव), प्रसाद साळुंखे (रा.वाकड), प्रफुल्ल नागपुरे(रा. आकुर्डी ) अशा तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
तसेच जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याबाबतची माहिती आम्ही लवकरच अपडेट करू.
चांदणी चौकातून नवीन पुलावरून कोथरूड कडे खाली येत असताना असणारा उतार धोकादायक ठरत असून या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत, त्यामुळे योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुळातच चांदणी चौक उड्डाणपूल होण्या पूर्वी या ठिकाणी असणाऱ्या उतारावर होत असलेल्या अपघातामुळेच चांदणी चौकाचा विषय चर्चेत आला होता. आणि त्यानंतरच या ठिकाणी योग्य नियोजनाची मागणी केली गेली होती. नागरिकांच्या मागणी नंतर उड्डाणपुलाची निर्मिती झाली मात्र हा पूल तयार करत असताना कोथरूडकडे येताना असणारा उतार कमी केला गेला नसल्याचे दिसत असून त्यामुळेच पूल होऊनही अपघात घडत आहेत असा आरोप नागरिक करत आहेत.