पुणे शहर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोथरूडच्यावतीने “शैक्षणिक भ्रष्टाचारा”चा रावण दहन

पुणे : जय श्रीराम, जय श्रीराम राजा राम.. च्या जयघोषात ”शैक्षणिक भ्रष्टाचारा”चा रावण दहन करण्यात आला.  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोथरूड येथील स्वा.वि. दा. सावरकर मैदान, उजवी भुसारी कॉलनी येथे हा रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी अनेक विद्यार्थी, तरुणाई व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा या कार्यक्रमाचे ८वे वर्षे होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या संकल्पनेनुसार नव्या पिढीला हिंदू धर्मातील परंपरेचे महत्व पटूवन देण्याच्या उद्देशाने हे रावण दहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अन्याय आणि अंहकाराचे प्रतिक म्हणून रावणाच्या पूतळ्याचं दहन केलं जातं म्हणून पार्श्वभूमीवर ”चला, समाजातील वाईट प्रवृत्तींचे विविध सामाजिक प्रश्नांचे दहन करू या, आपली ऐतिहासिक परंपरा जोपासू या!” शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे प्रतीकात्मक रावण दहन करण्यात आले. यावेळी आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया  यांनी आयोजन केले.निमंत्रक मा नगरसेविका श्रीमती पुष्पा कनोजिया व मनसे शाखाध्यक्ष प्रसाद गोखले होते.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

भारतभूमीचे रक्षण करुन अतुलनीय पराक्रम केले असे कार्यक्रमाचे मुख्य सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मेजर वसंतराव नगरकर यांना पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे सरचिटणीस वसंत मोरे, माजी नगरसेवक अॕड.किशोर शिंदे, महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड सचिन पवार, कार्यकारणी सदस्य रुपेश घोलप, क्रीडा अध्यक्ष महेंद्र जाधव, अॕड.सचिन ननावरे , माथाडी सेना राहुल वाघवले, विद्यार्थी सेना शहर संघटक ॲड अमेय बलकवडे, विक्रांत भिलारे,  निलेश जोरी, केतन डोंगरे, धनंजय दळवी, संतोष वरे , प्रविण कदम, मंदार ठोंबरे, तुपे, सागर राऊत, आशिष तुरे,  हेमंत पासलकर, रुपेश गायकवाड आणि वॉल्स ग्रुप चे अतुल भारती,बंटी मेश्राम, श्रीकांत कापसे, बाळासाहेब भोंग, संदीप कुदळे, डेंब्या कुंभरे, तुषार पंडीत, मित्र परिवार उपस्थित होते.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया म्हणाले, हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण. आज समाजात शैक्षणिक भ्रष्टाचार, लाचखोर, बलात्कारी, निर्दयी हत्या, धर्मांध, लव्ह – जिहादी आतंकवादी तसेच शिक्षणच काय, वैद्यकीय क्षेत्रातील वाढती लुटमारी अशा अनेक वाईट प्रवृत्ती वाढत आहेत. त्याला कुठे तरी कायमचा आळा बसला पाहिजे आणि आपल्या नव्या पिढीला हिंदू धर्मातील परंपरेची माहिती व्हावी, त्यांनी त्या दिशेने जीवनात मार्गक्रमण करावे या उद्देशाने या रावण दहणाचे आयोजन करण्यात आले.रावण दहन कार्यक्रमापूर्वी स्वच्छंद प्रस्तुत ”राम घ्यावा, राम द्यावा” हा सुरेल भजन संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन संजय काळे व आभार सचिन विप्र यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये