कोथरुड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम

कोथरुड :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी हजेरी कोठी अंतर्गत डहाणूकर काॅलनी व लक्ष्मीनगर झोपडपट्टीत परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्वच्छता अभियानाला महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. या परिसराची नगरसेवक, नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.

Screenshot 2020 09 17 17 27 02 21

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डहाणूकर सर्कल येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून सर्वांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे.

यावेळी मोहोळ यांच्या हस्ते सफाई सेवकांना हातमोजे, मास्क, सॅनिट्रायझर बाटल्या व साबण वाटप करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत नवनाथ जाधव, दिनेश माथवड, दुष्यंत मोहोळ
अमित तोरडमल, सौमित्र देशमुख, बापू मोहोळ, सचिन मोहोळ, बाळू दांडेकर, उल्का मोकासदार, इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर स्वच्छता अभियान महानगरपालिका सहाय्यक आयुक्त  संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे मोकादम वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे यांनी राबविले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये