
पुणे : कोथरुड येथील महात्मा सोसायटीने गल्ली नंबर 4 चा रस्ता बंद करून आजूबाजूच्या परिसरातील सोसायटीत रहाणाऱ्या हजारो नागरिकांच्या रोजच्या दळवळणाचा प्रश्न उपस्थित करून अडचण निर्माण केल्या बाबतीत परिसरातील नागरिकांनी याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते शंकर केमसे व अमर सुतार, सुहास उभे, अरुण कदम यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत स्थानिक नागरिकांनी आपल्या अडचणी शंकर केमसे यांच्या कडे मांडल्या. चर्चे दरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने शंकर केमसे यांनी लक्षात आणून दिली, सदरहू रस्ता बंद केल्याने रोजच्या दळणवळणा बरोबरच अत्यावश्यक सेवांना (अग्निशमन, रुग्णवाहिका, शाळेची वहान) सुद्धा अडचण निर्माण होत आहे. तरी याबाबत स्थानिक नागरिकांना आश्वस्त करून महापौर व आयुक्त यांच्या समोर पुणे महानगरपालिकेत हा विषय मांडून व या प्रकरणात सध्यस्थीतीत न्यायालयीन प्रक्रिया चालू असून त्यात सुद्धा कायदेशीर मदत करून सदरील रोडचा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास दिला.
यावेळी श्री.नगरकर, श्री.पाटील, श्री.आयनपुरे, श्री.खाडे, श्री.औटी, श्री. खाडे आदी यावेळी उपस्थित होते.






