पुणे शहर

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक संगमवाडीत झालेच पाहिजे- विजय डाकले

पुणे : आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक संगमवाडी येथे झालेच पाहिजे या मागणीकरीता आज सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या शिष्टमंडळामध्ये वैजनाथ वाघमारे ,अशोकतात्या जाधव , रामभाऊ कसबे, लहू कांबळे, शंकर तेलंगे संतोष बेंद्रे,विजय बगाडे, संतोष गायकवाड,  श्रीनिवास दासारी, अमोल डाकले  आदी प्रमुख सहभागी होते.

स्मारकाच्या आरक्षण विषयामध्ये आर्ट गॅलरी हे रद्द करुन फक्त स्मारकासाठीचे आरक्षण असावे असा बदल व्हावा ही शिष्टमंडळाची मागणी आहे. स्मारकाचे काम त्वरित चालु व्हावे याकरीता विषेश समितीची स्थापना करावी आणि ५०० कोटींची विषेश तरदुत राज्य सरकारने करावी अशा मागण्यांसाठी आग्रह धरण्यात येत असुन शरदचंद्र पवार साहेब, अजित पवार, सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदार व खासदार यांना प्रत्यक्ष भेटुन चर्चा करण्यात येणार आहे.

Img 20201024 wa0166 1
Img 20201028 wa0145

याबाबत ऊद्या ३:०० वा पुणे महापालिकेवर स्मारकाच्या प्रयोजनात बदल, निधी तरतुद,  विषेश समितीची स्थापना प्रश्नावर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती विजय डाकले यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये