पुणे शहर

महापौर म्हणतात खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी : पृथ्वीराज सुतार

बेड मिळत नसल्याने पृथ्वीराज सुतार यांनी दिला आंदोलनाचा इशारा..

पुणे : महापौरांनी घेतलेल्या पक्षनेत्यांच्या कोरोना आढावाच्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवले आहेत, असे सांगितले आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये परिस्थिती वेगळी आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जेव्हा उपचारसाठी ॲडमीट होण्यासाठी जात आहेत, तेव्हा त्यांना खाजगी रुग्णालयांकडून आम्ही कोरोनासाठी बेडस ठेवले नाहीत असे सांगितले जात आहे. याचा अर्थ प्रशासनाने अजूनही या कोविडच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही, त्यामुळे त्वरीत सर्व खजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्याबाबत आदेश काढावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.

याबाबतचे पत्र सुतार यांनी महापालिका आयुक्तांना दिले असून तातडीने या संदर्भात आदेश काढण्याची मागणी केली आहे.  सुतार यांनी म्हंटले आहे की, पुणे शहरामध्ये कोरोनाचे संकट पुन्हा वाढले असून , साधारण रोज सहा हजाराच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहचली आहे. ज्या रुग्णांना उपचारांची गरज आहे असे रुग्ण जेव्हा खाजगी रुग्णालयांमध्ये अॅडमिट होण्यासाठी जातात तेव्हा त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये अॅडमिशन मिळत नाही नसल्याचे समोर येत आहे. खाजगी रुग्णालयांकडून त्यांना आम्ही कोरोनासाठी बेडस ठेवले नाहीत असे बेधडक पणे सांगितले जात आहे. एकीकडे प्रशासन बेड राखीव ठेवल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे रुग्णालय बेड ठेवले नाही म्हणून सांगत आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे.

आपल्या मनपाच्या डॅशबोर्डवरती उपलब्ध बेड्सची संख्या ,रुग्णालयाचे नाव दाखविले जाते, त्याप्रमाणे रुग्णांचे नातेवाईक संबंधित रुग्णालयांमध्ये गेल्यावर त्यांना परत पाठविले जाते यामुळे नातेवाईकांना व रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत शहरातील सर्व खजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्याबाबत आदेश काढावेत,जी रुग्णालये आदेशाचा भंग करतील,त्यांच्यावर कारवाई करावी. या बाबतची अंमलबजावणी झाली नाही तर  “शिवसेना” पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सुतार यांनी सांगितले आहे.

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये