एसटी संपामुळे एवढया कोटींचे नुकसान ; परिवहन मंत्री परब यांनी दिली माहिती..

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या संपामुळे महामंडळाचे 650 कोटींचे नुकसान झाले असून 25 हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली आहे.
आतापर्यंत 57 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेतले जाईल. या कर्मचाऱ्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केल्या आहेत, याबाबत चौकशी करण्यात येत असून ती पूर्ण झाल्यावर वारसांना नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात दीपक चव्हाण, मेघना साकोरे आदी सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. तिचा अहवाल 12 आठवड्यांत येणार असून, त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही परब यांनी सांगितले.
जे कर्मचारी करोनामुळे मृत्युमुखी पडले त्यांनाही महामंडळाने पाच लाख रुपये दिले आहेत. तसेच करोनाने मृत पावलेल्यांच्या वारसांपैकी 222 अवलंबितांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केले असून, 34 अवलंबितांची नोकरीची प्रकरणे मंजूर करून आतापर्यंत 10 वारसांना नोकरी देण्यात आल्याचे परब यांनी सांगितले. ( परिवहनमंत्री परब किंवा एसटीचे छायाचित्र वापरणे)



