अधिवेशनाचा कालावधी वाढवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

मुंबई : अधिवेशनाचा कालावधी वाढवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधी या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी, पुरवणी मागण्या मंजूर करून घेणे, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे यामध्ये सरकारला रस आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची आहेत, तेव्हा अधिवेशनचा कालावधी वाढवण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहामध्ये पेपर फूटी विषयावर विरोधक म्हणुन आक्रमक भुमिका घेणार आहोत. सगळे विषय सविस्तर मांडू, असे पाटील म्हणाले.
साधारणतः हे लोकशाहीच मंदीर आहे लोकशाहीचा अनादर दाखवण्याचा काम कोणीही दाखवू नये, असे म्हणत मुनगंटीवार यांनी कामकाज सुरळीत चालावे अशी अपेक्षा व्यक्त केली. “आज बघितले तर महाराष्ट्राच्या समोर 200 प्रश्न आहेत. आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार आहे. कामगार, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यावर चर्चा करण्याची एक जागा आहे, ती म्हणजे विधानभवन. त्यामुळे चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी आमची आग्रही मागणी राहणार आहे” असे मुनगंटीवार म्हणाले.



