पोलिसांचे आरोग्य ; चिंतन, मंथन आणि उपाय : महाराष्ट्र राज्य पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने

साल आहे दोन हजार बावीस
निरोगी आयुष्य जपतील आपले पोलीस..
2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस दल व दलाचा ध्वज फडकविण्यात आला. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे. आज आपण सर्वजण महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस साजरा करतो. परंतू डाॅक्टर म्हणून काम करत असताना पोलिस दलातील बरेच पोलीस ज्या वेळी उपचार घेण्यासाठी दवाखान्यात येतात, तेव्हा नक्कीच पोलिस दलातील कर्मचारीवर्ग यांच्या आरोग्याविषयी बोलणे आवश्यक होते.
सतत काम, दहा ,बारा, सोळा तास काम.सदैव कामावर तैनात ह्या मुळे सांधेदुखीचा आजार बर्याच पोलिसांना होताना दिसत आहे. भारतीय उपचार पद्धती आयुर्वेदानुसार सांधेदुखी हा एक वाताचा आजार आहे. वेळीअवेळी जेवन करणे, बर्याच वेळ उपाशी राहणे, खाण्यामध्ये जंक फूडचा अती वापर, जागरण, झोप नीट होणे, वातूळलेले पदार्थचे सेवन करणे अश्या कारणांमुळे वात प्रकार शरिरात वाढतो. परिणामतः सांधेदुखी, कंबरदुखी, मानपाठ, गुडघेदुखी, पायांवर सूज येणे, हात पायाला मुंग्या येणे अशा प्रकारची दुखणी सुरू होतात. अशी दुखणी पोलिस दलातील कर्मचारी वर्गातील अनेकांना जाणवतात.
अतिकाम, ताणतणाव, कधी मोर्चासोबत चालणे, कधी सतत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे राहणे, पहारा, गस्त घालणे, बंदोबस्त जागरण या पोलिसांच्या कामातील दैनंदिन गोष्टी. आज बर्याच पोलीस मित्रांना उच्चरक्तदाब, मधुमेह असे आजार होताना दिसत आहेत. गाऊट सारखा संधीवाताचा आजार पण पोलिसांमध्ये दिसून येतो.
आज ह्या पोलिस दल स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस मित्र, सहकारी ह्यांनी आपल्या आरोग्याकडे काळजी पूर्वक लक्ष केंद्रित करून काम करणे आवश्यक आहे ह्या बाबात नक्कीच विचार केला पाहीजे.
सकस आहार, योग्य तो व्यायाम, मानसिक तणावमुक्त जीवन कसे जगता येईल त्यासाठी प्रयत्न करणे, आपले कोणी फॅमिली डॉक्टर असतील, स्पेशालिस्ट डाॅक्टर मित्र असतील तर आपण पोलीस बांधवांनी नक्कीच आपले आरोग्य कसे निरोगी राहील ह्या साठी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
आपण पोलीस बांधव जे समाज रक्षणाचे काम करत आहात त्यासाठी मानाचा सलाम तर आहेच पण आपले आरोग्य उत्तम रहावे ह्यासाठी नक्कीच विचार झाला पाहीजे. चला तर मग आज ह्या नविन वर्षात पोलीस दल स्थापना दिनी सर्व पोलीस बांधवांचे आरोग्य उत्तम राहील ह्यासाठी प्रयत्न करूयात.
डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ हर्डीकर हॉस्पिटल




