पुणे शहर

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत मुळशीतून सुनील चांदेरे यांचा विजय पहिला निकाल…

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांवरील
मतमोजणी आज होत असून मुळशी चा पहिला निकाल हाती आला आहे.मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील चांदेरे यांनी विजय मिळवला आहे.चांदेरे यांना 28 मते मिळाली तर कलाटे 17 मते मिळाली.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण 21 जागा असून त्यापैकी 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर सात जागांसाठी दोन तारखेला मतदान पार पडले होते त्या तालुका मतदार संघातून राष्ट्रवादी चे बोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे आणि सलग बावीस वर्षे संचालक राहिलेले आत्माराम कलाटे एकमेकांविरोधात रिंगणात होते. त्यात चांदेरे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा देऊन पॅनलमध्ये घेतल्याने त्यांचा विजय सोपा झाला होता.

Img 20220104 wa0039
Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये