महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण; एकनाथ शिंदे घेणार होते आज भेट

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या सत्ता नाट्यात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार संकटात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना तब्बल ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यातील सत्तानाट्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारींना ताप येत होता. खबरदारी म्हणून त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे आज अहवाल आले असून त्यांना करोना झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं आज सकाळीच राज्यपाल कोश्यारींना रिलायन्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयात दाखल केल्यामुळं आता ही प्रक्रिया अजून दोन ते तीन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये