महाराष्ट्र

भाजप साथीने पुढे जाणार; की राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जुळवून घेणार? याचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार : संजय शिरसाठ

गुवाहाटी : आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर नाराजी आहे. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी नाही. भाजपच्या साथीने पुढे जाणार; की राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जुळवून घेणार? याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. त्यानंतर शिरसाठ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना रात्री चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीही चर्चा किंवा प्रस्तावावर चर्चा झाली नाही. चर्चा करायला येत असताना मी कुठलेही पक्षविरोधी काम केलेले नाही. असे असताना मला गटनेतेपदावरून काढलं. मला बदनाम केलं जातंय. याबद्दल मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. हे बरोबर नाही असं सांगितलं. आमदारांच्या मनातील भावना मी तुमच्याकडे याआधीही मांडलेली आहे, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. शिवसेनेने निवडलेला गटनेता हा नियमबाह्य आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे ही निवड अवैध आहे. हा कायदेशीर मुद्दा होऊ शकतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

माझ्यासोबत जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जीने आमदार आमच्यासोबत आहेत. जवळपास चाळीसपेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. कालही मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेब आमच्यासाठी आदर्श आहोत. काल आज आणि उद्या आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमची भूमिका सुरुवातीपासूनच हिंदुत्त्वाची होती. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये