पुणे शहर

मुळा- मुठा नदीकाठचा होणार कायापालट ; नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’चा दर्जा : मुरलीधर मोहोळ

पुणे :  पुण्यातून वाहणाऱ्या मुळा मुठा नद्यांचा विकास व्हावा, नदी काठ सुंदर व आकर्षक असावा अशी सर्वच पुणेकरांची फार वर्षांपासूनची इच्छा आहे. आणि आता ही इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, कारण पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा या नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करून पुणे महापालिकेने हाती घेतलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’चा दर्जा मिळाला आहे. हा दर्जा मिळण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेल्या या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. गेले दिड वर्ष सातत्याने आपण यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहार व संपर्काला आज अखेर यश आल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. Status of ‘Special Purpose Vehicle’ for River Rehabilitation Project: Muralidhar Mohol

Fb img 1618020003793

मोहोळ म्हणाले, ‘नदी पुनरुज्जीवन कामाच्या अनुषंगाने जिओटेक्रिकल, इनंव्हेस्टिगेशन रिपोर्ट, हायड्रोलॉजी, हायड्रोलिक्स रिपोर्ट, एरिया असेसमेंट, एल्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, कन्सेप्ट मास्टर प्लन आदी कामे पूर्ण झालेली आहेत. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविल्याने नदीची पूरवहन क्षमता वाढणे, नदीलगतचा रहिवासी भाग सुरक्षित होणे, नदी किनारी हरित पट्टा विकसित होणे, पब्लिक स्पेसेस अंतर्गत नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, बेंचेस, उद्यान विकसित होणे, नदीलगत असलेली वारसा स्थळे जतन करणे, नदी किनारी होणारे अतिक्रमणे, राडारोडा/कचरा टाकण्यास आळा बसणार असून नदीतील पाणी स्वच्छ राहणेस मदत होणार आहे.

Fb img 1618019992123

मुळा-मुठा या नद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी कंटोन्मेट बोर्ड व पुणे महानगरपालिका हद्दीमधून बाहत असल्यामुळे व नदीच्या जागेबाबत महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत जलसंपदा विभाग, पुणे यांचाही संबंध येत असल्याने नदी पुररुज्जीवन प्रकल्प राबविणे करिता वरील सर्व संस्था मिळून स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन  करण्याची आवश्यकता होती. स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन करणेसाठी तसेच स्पेशल पर्पज व्हेईकलला (SPV) नदीची जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करणेस  मुख्य सभा, पुणेमहानगरपालिका ठ.क.१०३५, दि. २३/०२/२०१८ अन्वये मान्यता देण्यात आली होती. राज्य सरकारनेही आता हा प्रकल्प करण्यासाठी SPV ला मान्यता दिली आहे.

Img 20210223 wa0156

सदर प्रकल्प राबविताना टप्याटप्याने प्रकल्प सुरु करण्याच्या दृष्टीने तीन प्राधान्याने भागांचा विचार करण्यात आला आहे, जेणे करुन प्रकल्प कसा असणार आहे याबाबतची कल्पना या पायलट स्ट्रेच मधून येणार आहे.

१. संगमपुल ते बंडगार्डन-दोन्ही काठ मिळून ९.२ किमी
२. मुंडवा ते खराडी- दोन्ही काठ मिळून ७.१ किमी
३. ऑध ते बाणेर- दोन्ही काठ मिळन ८.५ किमी.

पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच जन आरोग्य व पर्यावरणाला पूरक अश्या ह्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे काम आता लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये