खडकवासला मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांना विजयाचा विश्वास
प्रचार दौऱ्याला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
खडकवासला मतदार संघाची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह असून सर्वजण प्रचारात सहभागी झालेले आहेत. २३ नोव्हेंबरला जो निकाल लागेल तो आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे असा विश्वास खडकवासला महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी व्यक्त केला.
खडकवासला महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात खडकवासला गावातील भैरवनाथाचे दर्शन घेऊन केल्यानंतर मागील तीन दिवसात दोडके यांनी मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात पदयात्रा, रॅली काढून मतदारांशी संवाद साधत विकासाची हामी दिली. या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, आप, समाजवादी पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
सचिन दोडके म्हणाले, मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उत्साह जास्त आहे. मागच्या वेळी थोड कमी पडलो पण यावेळी लीड घेऊन आम्ही विजय होऊ याबद्दल विश्वास आहे. माझ्या समोर कुणाचं आव्हान नाही. ते वाईट आहेत म्हणून मला मतदान करा असं नाही तर आम्ही चांगली काम केली आहेत आणी करू शकतो म्हणून आम्हला मतदान करा या बेसवर आम्ही चाललो आहे. महाविकास आघाडी मध्ये कौटुंबिक वातावरण असून सर्वजण एकजूट होऊन प्रचाराला लागलेले आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे.