पुणे शहर

महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय वाघमारे यांचे निधन

पुणे : महावितरण पुणे परिमंडलाच्या पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय वाघमारे (वय ५२) यांचे गुरुवारी, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी रुबी हॉल क्लिनिक (पुणे) येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

मे २०२६ मध्ये पुणे परिमंडलाच्या पायाभूत विकास आराखडा विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदलीवर रुजू झालेले वाघमारे यापूर्वी महावितरणच्या सांघिक कार्यालयात अधीक्षक अभियंता (अपारंपरिक ऊर्जा) म्हणून कार्यरत होते. महावितरणमधील प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत वीज क्षेत्रातील विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले.

वीज मंडळात १९९९ साली सहायक अभियंता पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी २००६ साली सरळ सेवेतून उपकार्यकारी अभियंता, २०१० साली अतिरिक्त कार्यकारी अभियंता, २०१६ साली कार्यकारी अभियंता आणि २०२४ साली सरळ सेवेतून अधीक्षक अभियंता म्हणून जबाबदारी स्वीकारली. या प्रदीर्घ सेवाकाळात कल्याण, पुणे, केडगाव, बारामती तसेच मुंबई येथे त्यांनी विविध पदांवर काम केले.

महावितरणच्या अभियंता व अधिकारी वर्गासह वीज क्षेत्रात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीर्घ सेवेतून त्यांनी केलेले कार्य आणि वीज क्षेत्रासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता महादेव मंदिर, रहाटणी (पिंपरी-चिंचवड) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये