पुणे शहर

शाही अभ्यंगस्नान, नवे कपडे, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांनी ‘ लुटला दिवाळीचा आनंद !

माजी नगरसेवक श्रीकांत पाटील आणि सहकाऱ्यांच्या वतीने अनोखी दिवाळी

पुणे : शाही अभ्यंग स्नान, नवे कपडे जोडीला फराळाचा आस्वाद आणि मुबलक फटाके उडविताना जीवनात ‘आपलेही कुणीतरी आहे’, हा भक्कम आधार अनुभवत ‘त्यांनी ‘ दिवाळीचा आनंद लुटला. निमित्त होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी नगरसेवक श्रीकांत पाटील आणि सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रमातील मुलांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी उपक्रमाचे.

Img 20221021 wa00011331728156984263886

‘ स्पर्श अनाथ आश्रमा’ त झालेल्या या उपक्रमात प्रारंभी मुलांना अभ्यंग स्नान घालण्यात आले. त्यानंतर नवे कपडे परिधान करून या मुलांनी फराळाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मनसोक्त फटाके उडविण्याचा आनंद लुटताना ते हरखून गेले. नवे कपडे, मिठाई, फराळ आणि फटाके अशा शाही सरंजाममुळे ‘आपलेही कुणीतरी आहे ‘ हा भाव या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर दिसला.

Screenshot 2022 10 19 10 52 53 83

या उपक्रमात सादिक शेख, नाजिम मणियार, अनिताताई बहिरट,दिलशाद आत्तार, वसुधाताई निरभवणे, पुष्पाताई निघोजकर, ज्योतीताई बहिरट, सीमाताई कदम, नसीम पिरजादे, अख्तरी शेख आदींसह पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक श्रीकान्त पाटील म्हणाले की, तुम्ही एकटे नाहीत तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा आधार देताना या मुलांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.

समाजाप्रती आपलेही कर्तव्य असते या भावनेतून ज्यांना कुणीही नाही ,अशा अनाथांसह दुर्लक्षित घटकांसाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
– श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक

Img 20221021 wa0388
Fb img 1666355584270
Fb img 1666329573887
Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221021 wa0385
Img 20221021 wa0416
Img 20221021 wa0340
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221021 wa00106918126661476860729
Img 20221020 wa0232
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये