पुणे शहर, जिल्ह्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार

महायुतीमधील पक्षातील पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील पक्षातील पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा पुण्यात पार पडला. सर्वांनी एकोप्याने काम केले तर पुणे जिल्ह्यातील सर्व खासदारकीच्या जागा महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम संघटना आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा आज म्हात्रे पुल डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे पार पडला. पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



पुणे जिल्ह्यात महायुती भक्कम करुन विजय साकारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने काम करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी चांगलीच बांधणी सुरू केली असल्याचे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून पाहिला मिळाले. पुण्यातील लोकसभेची जागा विक्रमी मतांनी विजयी करण्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे, सिद्धार्थ शिरोळे, दत्तात्रेय भरणे, चेतन तुपे,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, l शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले, प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर, शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लगड, शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले, उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आर पी आय चे ॲड.मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केले.


