पुणे शहर

पुण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

पुणे : एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनातील नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भारती विद्यापीठ पोलिसांनी एका गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली. चौकशीला आल्यानंतर सदावर्ते यांना मराठा समाजाने विरोध केला. (Maratha Leader Protest Gunratna Sadavarte in Pune ) या वेळी मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

सदावर्ते यांचा विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या बाहेर दाखल झाले. सदावर्ते यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवरायांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होत. त्याचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्तेंना सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते प्रसारमाध्यमांशी न बोलता बाहेर पडले. सदावर्ते हे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा इन कॅमेरा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. परंतु नेमकी चौकशी काय झाली याबाबत वरिष्ठ अधिकारी सांगू शकतील, असे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी सांगितले.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये