पुणे शहर

नृत्य, काव्य, गोष्टींनी रंगली बालदिन दिवाळी 

पुणे : नृत्य, काव्यवाचन, गोष्टी, कलाकृती आणि मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रमांनी बालदिन दिवाळी साजरी झाली. ‘नाच रे मोरा, अंब्याच्या बनात’ या बालगीताने सुरू झालेला कार्यक्रम. चिंटूच्या गोष्टी व चिंटूच्या कलाकृतीपर्यंत पोहचला. राजीव तांबे यांच्या गंमतशीर व विनोदी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
संवाद पुणे व अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालदिनानिमित्त बालदिन दिवाळीचे पत्रकार भवनात आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, चारूहास पंडित, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे, नितीका मोघे, सचिन ईटकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, कविता मेहेंदळे, निर्मला सारडा आदी उपस्थित होते. 
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बालदिन दिवाळीला सुरूवात झाली. पायलवृंद संस्थेच्या वतीने व निकीता मोघे दिग्दर्शित ‘नाच रे मोरा’ या बालगीतावर भार्गवी ईटकर, शौर्या थोरवे, आराध्या जराड या बालकांनी नृत्य केले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

त्यानंतर संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पडद्यामागील कलाकारांच्या 45 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महापौरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पडद्यामागील 50 तंत्रज्ञांने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चारूहास पंडित यांनी चिंटूच्या गोष्टी सांगितल्या व चिंटूची कलाकृती सादर केली. त्यानंतर  डॉ. संगीता बर्वे यांनी काव्यवाचन केले. यावेळी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, संजीवनी मराठे, इंदिरा संत, लीलावती भागवत यांच्या कवितांचेही वाचन करण्यात आले. तर राजीव तांबे यांनी बालक-पालकांना मार्गदर्शन केले. 
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. दुष्यंत मोहोळ यांनी शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाबद्दल माहिती दिली. मुकुंद तेलीचरी यांनी सुत्रसंचालन केले. तर डॉ. दिलीप गरुड यांनी आभार मानले. 

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm
Screenshot 2020 1113 160133
Screenshot 2020 1113 155906
Screenshot 2020 1113 155814 1
Img 20201113 wa0322
Screenshot 2020 1113 155747

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये