पुणे शहर

कोथरुडमधील स्थानिक प्रश्नांसाठी मेधा कुलकर्णी चंद्रकांत दादा सोडून डायरेक्ट फडणवीसांच्या भेटीला….

पुणे : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस काल पुणे दौर्‍यावर असताना कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड मतदार संघातील नागरिकांना घेऊन विविध समस्यांबद्दल त्यांची भेट घेतली. नागरिकांचे प्रश्न समजावून घेत फडणवीस यांनी या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट केली असून याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Medha Kulkarni met Fadnavis instead of Chandrakantdada for local issues in Kothrud.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरुडचे विद्यमान आमदार असताना कोथरुड मतदार संघातील नागरिकांच्या प्रश्नाबाबत कुलकर्णी यांना विरोधी पक्षनेते फडणवीस यांना भेटण्याची का वेळ आली. यावर आता चर्चा रंगताना दिसत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासूनच पाटील आणि मेधा कुलकर्णी यांच्या मध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे.

यासंदर्भात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सुस रस्त्याला महानगरपालिकेने एक चुकीचा कचरा प्रकल्प सुरू केला असून त्याचा नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे. रहिवाशी परिसराच्या पाचशे मीटर अंतरामध्ये असा प्रकल्प करता येत नाही. एनजीटीनेही नागरिकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तरीही महापालिकेने हा प्रकल्प सुरू ठेवला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे याबाबत विचार करण्यात यावा. यासाठी व एका राष्ट्रीय खेळाडूच्या नोकरीच्या प्रश्नासाठी आपण फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

या प्रश्नांबाबत आपण तीन ते चार वेळा भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांचीही यापूर्वी भेट घेतली आहे. पण प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांनीच देवेंद्र फडणवीस पुण्यात येत असल्याने त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडण्यासाठी माझ्याकडे विनंती केली होती. आणि म्हणूनच नागरिकांना घेऊन   आपण फडणवीस यांची भेट घेतल्याचे कुलकर्णी यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये