पतित पावन संघटनेच्या कार्यास सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील
कोथरुड : मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तेव्हापासून पतित पावन संघटनेच्या कार्याशी परिचित आहे, कोथरूड हा पतित पावन चा बालेकिल्ला असून संघटनेच्या कार्यास सर्वतोपरी मदत करेन असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. will help the work of the patit Pawan sanghatana : Chandrakant Patil
आज पाटील यांनी कोथरूडमधील शास्त्रीनगर येथे पतित पावन चे उपाध्यक्ष जालिंदर तथा पप्पू टेमगिरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळमकर, पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, विभाग प्रमुख राजू मोहोळ, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सुनिल मराठे , खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष निलेश घारे, शरद देशमुख, अण्णा बांगर यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी एक तासाच्या भेटीत पतित पावन संघटनेच्या सध्याच्या कार्याची माहिती घेतली, तसेच परिसरातील नागरी समस्या ही समजून घेतल्या. महिला बचत गटाच्या कार्याला त्वरित मदत जाहीर करतानाच कोणत्याही कामासाठी मी सदैव उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळमकर यांनी संघटनेच्या कार्याची व कार्यकारिणीची यावेळी माहिती दिली.
पतित पावन संघटनेने मला घडवले असून मी संघटनेचे ऋण कधीच विसरु शकत नाही. जसा एखाद्या स्त्रीला माहेरी गेल्यावर आनंद होतो तसा मला आज माहेरच्या मंडळींना भेटल्याचा आनंद होतो आहे असे पूर्वाश्रमीचे पतित पावन संघटनेचे संदीप खर्डेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पतित पावन हा माझ्यासाठी भावनिक विषय असून संघटनेसाठी जे जे शक्य आहे ते ते करण्यास मी कटिबद्ध आहे असेही खर्डेकर म्हणाले.