पुणे शहर

मेधा कुलकर्णी यांच्यावर महिलेला मारहाणीचा आरोप, तर कुलकर्णी यांनी आरोप फेटाळत ही बाजू मांडली…  

पुणे : पौड रस्त्यावरील रामबाग कॉलनीतील एका सोसायटी बाहेर रसवंती गृह चालवणाऱ्या महिलेला माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी तक्रारदार महिला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड पोलीसांकडे जात तक्रार केली आहे. मात्र मेधा कुलकर्णी यांनी या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत हे आरोप फेटाळून लावले आहेत.Medha Kulkarni was accused of beating a woman, while Kulkarni denied the allegations.   

रामबाग कॉलनीतील गणेशकुंज सोसायटीबाहेर मनिषा संतोष भोसले या तक्रारदार महिलेकडून फिरत्या रसवंती गृहाची गाडी लावली जात होती. त्या कारणावरून सोसायटीतील रहिवाशी जयेश कुलकर्णी यांचे महिला व तिच्या पती सोबत वाद झाले होते. त्यावेळी ही मारहाण झाल्याने संबंधित महिलेने कोथरूड पोलीसांकडे तक्रार देत दाद मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी दोघांनाही समज देऊन हा विषय सोडविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

Img 20210319 wa0097

त्यानंतर संबंधित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबतीत तक्रार केली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) पुन्हा जयेश कुलकर्णी व मनिषा भोसले यांच्या मध्ये वाद झाले. यावेळी कोथरूड च्या माजी आमदार मेधा कुलकर्णी त्याठिकाणी उपस्थित होत्या. व त्यांनी भोसले यांना जयेश कुलकर्णी यांची माफी मागण्यास सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप  केला  जात असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी कोथरूड पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक डांगे यांची भेट घेतली. याबाबतीत कोथरूड पोलिस पुढील तपास करत आहेत. या बाबतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.

याबाबतीत सिंहासन न्यूजशी बोलताना माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, जयेश कुलकर्णी यांच्या सोसायटी बाहेर रसवंती गृहाच्या गाडीमुळे कचरा, घाण होऊन डासांचे प्रमाण वाढत आहे. कुलकर्णी यांची मुलगी अपंग आहे. या घाणी मुळे डास झाल्याने त्या मुलीला दोन वेळा डेंग्यू झाला असल्याने कुलकर्णी यांनी गाडी काढावी यासाठी महापालिकेकडे तक्रार केली होती. यामुळे वाद निर्माण झाला. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या वर पोलिसांकडून दबाव होता.भोसले यांनीच कुलकर्णी यांना मारहाण केली आणि त्यांच्यावर नाट्यमय सादरी करण करून संबंधित महिला आरोप करीत आहे. त्या आरोपात तथ्य नाही. पोलिस ही जयेश कुलकर्णी यांनाच धमकी देत आहेत की, तुम्हाला अटक करण्याची धमकी देत आहेत. पण काहीच न केलेल्या व्यक्तीला अटक कशी करणार ? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये