कोथरुड

व्यापारी सुरक्षित तर ग्राहक सुरक्षित ; पृथ्वीराज सुतार यांच्या प्रयत्नांतून गुजरात कॉलनी मधील व्यापाऱ्यांची रॅपिड अँन्टीजेन टेस्ट

कोथरुड : pune city, kothrud  पुणे महानगरपालिका कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने व समस्त कोथरूड व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने गुजरात कॉलनी मधील व्यापारी व कर्मचारी वर्गासाठी शिवसेना- गटनेते, स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून रॅपिड अँन्टीजेन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. Merchant safe so customer safe; Rapid antigen test of traders in Gujarat colony through the efforts of Prithviraj Sutar

सदरची टेस्ट रॅपिड अँन्टीजेन टेस्ट मोबाईल व्हँन पथकाने केली, यामध्ये 125 व्यापारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. शिवसेना- गटनेते, स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून या तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे डॉ.केतन खेटमाळी, डॉ.अंजली टिळेकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक,सचिन लोहकरे, गणेश साठे, करण कुंभार, हनुमंत चाकणकर, प्रमोद चव्हाण, रुपाली शेंडगे, सूरज पवार तसेच समस्त कोथरूड व्यापारी संघटनेचे शिवाजी कुंभार, राजू कवठेकर, बापू गुडमेवार, सुनील लोटलीकर, फुटरमल माली, धनेश बच्चेवार, कुंदन उणेचा, सुरेंद्र सोळंकी आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज सुतार म्हणाले की, कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापारी वर्गाला कोरोना पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. कारण आता काही प्रमाणात निर्बंध शिथिल झाले आहेत, त्यामुळे लोक खरेदीसाठी दुकानांमध्ये जात आहेत. दुकानांमधून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व नागरिक सुरक्षित रहावेत म्हणून कोथरुड मधील गुजरात कलीनी मधील व्यापारी वर्गाची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

IMG 20210707 WA0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये