पुणे शहर

वारजेत महिलांनी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली सदिच्छा भेट

वारजे : वारजे येथे दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांनी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी विरोधी पक्षनेत्या नगरसेविका दिपाली धुमाळ आणि माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे  उद्घाटन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोपाच्या दिवशी सदिच्छा भेट देत खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना प्रोत्साहन देत त्या करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

दरवर्षी दिवाळीपूर्वी तीन दिवस महिलांनी बनवलेल्या गृहउपयोगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांच्या कडून आयोजन करण्यात येत असते. या तीन दिवसांमध्ये वारजेतील अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत खरेदी करत असतात. यावर्षी शेवटच्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभागी महिला स्टॉल धराकांशी संवाद साधला व महिलांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी दिपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. १४ ते १७ ऑक्टोंबर दरम्यान मॅजेस्टिक हॉल, माई मंगेशकर हॉस्पिटल जवळ हा महोत्सव पार पडला.

या प्रदर्शनामध्ये दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणती, मसाले, पापड, लोणचे, रांगोळी, फॅन्सी कपडे, खाद्य पदार्थ अशा विविध गृहउपयोगी वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले होते. या महोत्सवात अनेक महिलां सहभागी होतात या सहभागी स्टाॅल धारकांकडून कुठलीही फी अथवा शुल्क आकारले जात नाही.  सर्व सोयीयुक्त सुविधा मोफत पुरविल्या जातात. या माध्यमातून  महिला सक्षमीकरण करण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत, तसेच या छोट्या महिला व्यावसायिकांना कायम स्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती या महोत्सवाच्या मुख्य आयोजक विरोधीपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिली.

Fb img 1647413711531
Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये