पुणे शहर

महिलांची स्वयंरोजगारातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल -चंद्रकांत पाटील

पतित पावन संघटनेने सर्व वस्त्यांमध्ये महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवावेत -चंद्रकांत पाटील

पुणे : स्त्री ही कुटुंबातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो किंबहुना स्त्रीयांच्या भोवती सगळे कुटुंब एकवटलेले असते,अश्या स्थितीत आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून भगिनींनी निवडलेल्या स्वयंरोजगाराचा मार्ग कौतुकास्पद असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Img 20210223 wa0156

जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवसासाठी महिलांना मान देण्याचा उत्सव नसून प्रत्येक दिवस हा महिलांच्या सन्मानाचा असावा असेही ते म्हणाले.डिजिटल युगात आणि कोरोना नंतरच्या काळात नोकऱ्यांची संख्या कमी होते आहे अश्या स्थितीत पतित पावन संघटनेने महिलांना स्वयं रोजगारासाठी प्रेरित केले हे कौतुकास्पद असून सर्वच वस्त्यांमध्ये संघटनेने असे उपक्रम राबवावेत ,त्यासाठी सर्वतोपरी मदत आपण करु असेही त्यांनी स्पष्ट केले.पतित पावन संघटनेच्या माध्यमातून महिलांना कापडी पिशव्या,मास्क यासह विविध कपडे शिवण्याकरिता मदत केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मधील शास्त्रीनगर येथील महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

Img 20210313 wa0015

या कार्यक्रमास भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेविका श्रद्धा प्रभुणे,पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, शहर पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, उपाध्यक्ष पप्पु टेमघरे, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, शरद देशमुख, सुनिल मराठे, अण्णा बांगर, रविंद्र भांडवलकर, तेजस पाबळे, यासह लता उभे, जयश्री टेमघरे, सुनंदा गांडले, उज्वला हवाले, सुमन विधाटे इ उपस्थित होते. येणाऱ्या काळात अन्य वस्त्यांमध्ये ही असे उपक्रम राबविण्यात येतील असे शहराध्यक्ष श्रीकांत शिळमकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये