पुणे शहर

आमदार शिरोळे यांच्याकडे मध्यप्रदेशातील घोराडोंगरी मतदारसंघाची जबाबदारी

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील घोराडोंगरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.

यापूर्वी पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत  मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या पक्ष नेतृत्वाने आमदार शिरोळे यांच्यावर सोपविल्या होत्या. मध्यप्रदेशातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन ही नवी जबाबदारी आमदार शिरोळे यांच्यावर सोपवली आहे.

पक्षाच्या विधानसभास्तरीय कोअर समितीची बैठक बैतुल जिल्ह्यातील शहापूर विश्रामगृह येथे रविवारी झाली. केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधी आणि प्रवासी कार्यकर्ता म्हणून तेथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांचे स्वागत केले.

विविध निवडणुकांमध्ये केलेल्या कामांचे अनुभव शिरोळे यांनी बैठकीत सांगितले. बूथ कमिटीच्या कामावरही तपशीलवार चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस कमलेश सिंह, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव चाडोकर, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल यादव, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत गावंडे यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष व घोराडोंगरी विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये