पुणे शहर

टोळक्याची दहशत मोडण्यासाठी पोलीस गस्त वाढविणार आमदार शिरोळे यांच्याकडून हुतात्मा ओंबळे मैदानाची पाहणी

पुणे : गोखले नगरमधील हुतात्मा तुकाराम ओंबळे मैदान, वीर बाजीप्रभू चौकात चाललेला मद्यपींचा गोंधळ आणि दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस गस्त वाढविली जाणार आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

मागील तीन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार गोखलेनगरमध्ये हुतात्मा तुकाराम ओंबळे मैदानावर तसेच वीर बाजीप्रभू शाळा या रस्त्यावर मद्यपी गोंधळ घालतात व दहशत पसरविण्याचे काम करतात असे निदर्शनास येताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) मैदान व परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या समवेत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रवी खंदारे होते.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

यावेळी या मैदानावर बेकायदेशीर प्रकार मध्यरात्रीपर्यंत चालू असतात, यामुळे या परिसरातील महिला व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम काही टोळक्यांकडून केले जात असल्याच्या तक्रारी आल्या. याकरिता टोळक्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्याचा निर्णय पाहणीदरम्यान करण्यात आला. तसेच या मैदानावरील खोलीमध्ये आरोग्य विभागाची कोठी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आमचे सरकार हे छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित आहे. याठिकाणी सर्वसामान्य जनतेवरील व महिलांवरील होत असलेले अत्याचार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत. जे गुंड प्रवृत्तीचे लोकं या परिसरात दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जन्माची अद्दल घडविण्यात येईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

यावेळी रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, आदित्य माळवे, सतीश बहिरट, राम म्हेत्रे, अपर्णाताई कुऱ्हाडे, विनोद धोत्रे, प्रशांत लाटे, ख़ुशीताई लाटे, सुजित गोटेकर, केतन जोशी, रमेश भंडारी, राजेश धोत्रे आदि उपस्थित होते.

Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये