पुणे शहर

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज सलग तीन ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सविस्तर पाहणी केली. पुणे महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत येरवडा, गणेशखिंड रस्ता आणि औंध (ब्रेमेन चौक) परिसरातील उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

 येरवडा परिसर मध्ये संगमवाडीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी २०२० मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाचे काम २०२६ मध्ये सुरू झाले असून, सध्या पिलर्सचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

एप्रिल २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे येरवडा, कल्याणी नगर, विमाननगर, डेक्कन आणि शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळेल.

उड्डाणपुलाखालील जागेचे स्थानिक संस्कृतीला साजेसे डिझाइन व सुशोभीकरण केले जात असल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे आमदार शिरोळे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.तसेच गणेशखिंड रस्ता व पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा मुख्य भाग पूर्ण झाला असून, पाषाण रॅम्पच्या ठिकाणी जमिनीखालील पाण्याच्या समस्येमुळे थांबलेले काम ‘रिटेनिंग वॉल’च्या मजबुतीकरणासह पुन्हा सुरू झाले आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. असे शिरोळे म्हणाले.

तसेच सेनापती बापट रस्त्याला जोडणारा आर्म आणि गणेशखिंड रस्त्यावरून औंध राजभवनाकडे जाणाऱ्या अंडरपासच्या कामांचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प २०२७ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

तसेच प्रस्तावित ब्रेमेन चौक ते औंध गावठाण उड्डाणपूल ची पाहणी व आढावा झाला . सदर उड्डाणपूल ची मागणी शिरोळे यांनी केली होती आणि त्याला मान्यता मिळाली आहे. 

पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडीकडून येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ब्रेमेन चौक ते औंध गावठाण दरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लँडिंगच्या ठिकाणच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात खासदार मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या नेतृत्वाखाली व पुणे महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली जाईल. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवड ते शिमला ऑफिस प्रवास पूर्णपणे सिग्नलमुक्त होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये