महाराष्ट्र

अखेर राज्य परिवहन विभागाने घेतला निर्णय राज्यातील वाहन चालकांची वाहन हस्तांतरण, नूतनीकरणाचे कामे जलद गतीने होणार…

“सिंहासन News”  आणि महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश

पुणे : राज्यातील परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरण,  नूतनीकरणाच्या आदी कामांसाठी आधार सक्तीचे करण्यात आल्याने राज्यभरातील परिवहन कार्यालयातील कामे रखडली आहेत. याबाबतीत “सिंहासन News”  आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर अखेर राज्य परिवहन विभागाने परिपत्रक काढून हा निर्णय रद्द करीत मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हे परिपत्रक काढले आहे.

आधार कार्ड वरून सक्तीचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग का आग्रही आहे. जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्यासाठी का टाळाटाळ करण्यात येत आहे. यामागे नक्की कोणाचा काय उद्देश आहे. हे समजत नाही. असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.तातडीने निर्णय घेऊन जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत होते. राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नवे परिपत्रक काढण्यात आल्याने राज्यभरातील वाहन चालकांची रखडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289



आधार सक्तीचा निर्णय रद्द पण का घेतला होता स्पष्टीकरणाची मागणी

परिवहन कार्यालयाने घेतलेल्या निर्णयानंतर मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रे नाव आणि पत्त्याचे कागद पत्र म्हणून सादर करता येणार आहे.आधार सक्तीचे नसताना देखील परिवहन विभागाने आधार सक्तीचे केले होते. याचे नेमके कारण काय आहे.? या निर्णयामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आधार सक्तीचा निर्णय केंद्र सरकारच्या की राज्य सरकारच्या आदेशाने लागू करण्यात आला होता. याचे स्पष्टीकरण देखील राज्य परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले पाहिजे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबतीत बोलताना महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार दुग्गल म्हणाले, आधार आणि वाहनाच्या कागदपत्रावरील नावात साम्य नसल्याने नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्यात अनेक नागरिकांची कामे रखडली होती. नव्या निर्णयामुळे निश्चितच फायदा होणार असून नागरिकांची कामे मार्गी लागणार आहेत.

काय आहे नव्या परिपत्रकात

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH), नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहन संबंधी सर्व कामकाज हे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication)
नुसार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि, आधारकार्ड वरील डेटा हा वाहन मालकाच्या नोंदणी प्रमाणपत्रातील तपशीलाशी जुळत नाही. त्यामुळे बऱ्याच वाहन मालक/युनियन यांच्या वाहन हस्तांतरण/ नाहरकत प्रमाणपत्राचे अर्ज वाहन प्रणालीवर करता येत नसल्याने तक्रारी या कार्यालयात प्राप्त होत आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी दिलेले निर्देश बंधनकारक नसल्याने यासाठी या कार्यालयाने वाहन ४.०
प्रणालीमध्ये सुधारणा करणेसाठी निर्देशक MoRTH व उप महासंचालक NIC यांना कळविले आहे.

तथापि, NIC कडून वाहन ४.० प्रणालीमध्ये यासाठी कोणताही बदल करण्यात आला नाही. सबब, राज्यातील बहुतांश परिवहन कार्यालयामध्ये नागरिकांची वाहन ४.० संबंधीत कामे प्रलंबित आहेत. सदर कामाचा निपटारा करणेसाठी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. वाहन मालकाचे नोंदणी प्रमाणपत्रावरील नाव/पत्ता आधारकार्ड प्रमाणे जुळत नसल्यास संबंधीत वाहन मालकांकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नाव/पत्ता दुरूस्ती करणेसाठी अर्ज घेऊन
नाव व पत्ता संबंधी आवश्यक पुरावे घ्यावे, जसे, आधारकार्ड/मतदान ओळखपत्र/पॅनकार्ड/पासपोर्ट इ. सदर पुराव्यांची पडताळणी करून वाहन मालकाचे नोंदणी प्रमाणपत्र दुरूस्त करून त्यांचे वाहनविषयी कामकाज करून द्यावे.

किंवा

वाहन प्रणालीवर ‘Please visit Aadhaar centre to update the pin code or visit
RTO/apply using mobile authentication, to avail contactless services. Name is
not matching in vahan and aadhaar.’ असा संदेश येतो. त्याप्रमाणे वाहन मालकास आधारकार्डमध्ये आवश्यक दुरूस्ती करून घेण्यास कळवावे.

२. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांचे निर्देशामध्ये नमूद केल्यानुसार वाहन मालकाचे वाहनविषयक अर्ज मॅन्युअल पद्धतीने आपल्या कार्यालयात स्वीकारावे. तसेच वाहन मालकाचे कार्यालयीन कामकाजासंबंधी सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावे व त्यानंतर संबंधीत कामकाज करावे. असे परिपत्रक परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी काढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये