पुणे शहर

वारजे हायवे परिसरात एमएनजीएलचा सावळा गोंधळ ; नागरीकांना गॅस कनेक्शन देण्याची दिपाली धुमाळ यांची मागणी..

वारजे : pune city, warje वारजे हायवे परिसरात असणाऱ्या सोसायट्यांमधील नागरिकांकडून एमएनजीएल बाबत अनेक तक्रारी केल्या जात आहेत. पैसे भरून काही नागरिकांना एमएनजीएलचे गॅस कनेक्शन मिळालेले नाही. काही ठिकाणी तीन चार वर्षापासून लाईन टाकून ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र कनेक्शन दिले गेलेली नाहीत. त्यामुळे एमएनजीएल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांना गॅस कनेक्शन देण्यासाठी योग्य ती प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. 

वारजे हायवे परिसरातील अनेक सोसायट्यांमधील नागरिक एमएनजीएलची गॅस लाईन येऊनही गॅस कनेक्शनच्या  प्रतीक्षेत आहेत. काहींना कनेक्शन मिळाले आहे तर काहींना मिळाले नाही. ५ ते ६ हजार रुपये भरून नोंदणी करूनही काही नागरिकांना कनेक्शन मिळालेले नाही. या परिसरात असणारे एमएनजीएलचे अभियंते, ठेकेदार, अधिकारी वारंवार बदलले जात असल्याने कामात दिरंगाई होत आहे. तीन चार वर्षापूर्वी टाकलेल्या लाईन सापडत नसल्याचा प्रकार ही घडत आहे. एकूणच एमएनजीएलच्या या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

Img 20211019 wa0235

एमएनजीएलने तातडीने नागरिकांच्या समस्येचे निराकरण करून त्यांना गॅस कनेक्शन द्यावीत, महापालिकेकडून काही सहकार्य लागणार असेल तर त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, पण एमएनजीएलने आता गॅस कनेक्शन देऊन नागरिकांना होणार त्रास थांबवावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Screenshot 2021 10 14 09 26 41 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये