पुणे शहर

पियुषा किरण दगडे पाटील यांचा नारीशक्ती-आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सुर्यदत्ता कॉलेजकडून सन्मान..

बावधन : pune city, bavdhan जनतेतून निवडून आलेल्या बावधनच्या प्रथम सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांना सुर्यदत्ता कॉलेजच्या वतीने “नारीशक्ती-आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रा.डॉ.संजय चोरडिया, प्रा.सुषमा चोरडिया, आयजीपी विठ्ठल जाधव उपस्थित होते. सरपंच म्हणून काम करत असताना बावधन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून मोलाचे योगदान दिल्याबद्दल सूर्यदत्ता कॉलेजच्या वतीने सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आपल्या भावना व्यक्त करताना पियुषा दगडे पाटील म्हणाल्या की, बावधन परिसरात पाणी आणणे, कचरा प्रश्न सोडवणे, विविध विकासकामांधून परिसर सुशोभीकरण करणे तसेच कोरोना काळात भरीव योगदान देऊन  बावधनकरांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न केला आहे.  आज नारी शक्ती – आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव झाल्याने केलेल्या कामाचे फळ मिळाल्याचे समाधान वाटत आहे. सरपंच म्हणून काम करत असताना नगरसेवक असलेले पती किरण दगडे पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांच्या प्रयत्नांतून पुणे महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले,

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये