पुणे शहर
मनसेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ वाटप

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विधानसभा मतदार संघ आणि ॲड.किशोर शिंदे मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या एस आय रूपाली शेडगे ,मुकादम संजय कांबळे यांच्यासह प्रभागातील सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मनसेचे जनहित कक्ष व विधी विभागाचे महाराष्ट्र सचिव संजय काळे,प्रभाग अध्यक्ष गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे,साधू धुमाळ, सचिन विप्र, रोहित मोकाटे,राजाभाऊ बलकवडे,पोपट बोत्रे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.










