नायलॉन मांजापासून पुणेकरांच्या सुरक्षेसाठी मनसे-हेल्प रायडरचे उचलले पाऊल ; दुचाकींना बसवल्या संरक्षक जाळ्या

नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत
पुणे : पतंगाच्या नाॅयलाॅन मांजामुळे अनेक जण पुणे शहरात आतापर्यंत दगावले गेले असून काही जणांना तर प्राणाला मुकावे लागले आहे. दुचाकीवरून जाताना नाॅयलाॅन मांजा गळ्याला कापल्यामुळे या घटना घडल्या आहेत त्यामुळे या घटना टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेतेकरीता मनसे आणि हेल्प रायडरने एक पाऊल पुढे टाकले आहे. नाॅयलाॅन मांजापासून वाचण्यासाठी दुचाकींना समोरच्या बाजूला संरक्षित जाळ्या बसवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्रांत या उत्सवाने होते. सध्या पुणे शहरात लहान मुले व तरुणाई पतंग उडविण्यात मग्न असतात. याच मंडळींकडून आनंद साजरा करत पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या नाॅयलाॅन मांजामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होत असून याची खबरदारी घेतली जाणे गरजेचे बनले आहे. सध्या बाजारात सर्रास विक्री होणाऱ्या नाॕयलाॕन मांजामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हेल्प रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशांत कनोजिया यांनी बालगंधर्व चौकात नागरिकांच्या दुचाकीला मोफत संरक्षण जाळ्या बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.



हजारो दुचाकींना या हे संरक्षक जाळ्या बसवण्याचा संकल्प प्रशांत कनोजिया यांनी केला असून पहिल्याच दिवशी 378 दुचाकींना सुरक्षा जाळी बसवण्यात आली. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले. प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी नरेंद्र तांबोळी, विनायक कोतकर, धनंजय दळवी ,केतन डोंगरे , प्रविण कदम, गौरव दांगट, अभिजीत देशमुख , सुबोध घोडके, प्रथमेश व्हनमोरे, मयुर शेवाळे, अविनाश वाघमारे,
हेल्प रायडर प्रविण पगारे, बाळासाहेब ढमाले, विनायक मुरुडकर, सुरेश पोतदार, संतोष कदम, शंकर म्हाळुंगे, संदेश परदेशी, सागर इंगळे, संतोष पोळ, निलेश चांडगे, प्रकाश रणदिवे आदी उपस्थित होते.






