पुणे शहर

सांस्कृतिक राजधानीत “बालगंधर्व पुरस्काराच्या दिरंगाईबद्दल मनसेने मनपा आयुक्तांना विचारला जाब…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने २०२०व २०२१सालचा बालगंधर्व पुरस्कार जाहिर करूनही पुरस्कार प्रदान केला नाही  याबाबत पुणे मनपा आयुक्त यांना पुरस्कार दिलेल्या कलाकारांना पुरस्कार वितरण करावा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेते राजेंद्र (बाबू) वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव रमेश जाधव, रवी सहाणे, मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, विभाग सचिव श्रीनिवास दिसले यांनी दिले. डॉ. भोसले यांनी पुरस्कार समारंभ आयोजित करून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे व पुरस्कार प्राप्त झालेल्या कलाकारांना कळविण्याचे आश्वासन दिले.

 नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी ज्येष्ठ कलाकारास मानाच्या बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येते त्याचबरोबर नाट्य क्षेत्रातील पाच कलाकारांचा सत्कार केला जातो. तसेच महापालिका इतर  विविध १३पुरस्कार देते.  कोरोना काळापासून पुरस्कार देणे बंद झाले त्यानंतर प्रशासनाने पुरस्कार देण्याबाबत रुची दाखवली नाही.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांना २०२०आणि शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू यांना२०२१सालचा महापालिकेच्या वतीने बालगंधर्व पुरस्कार  जाहीर होऊन तीन वर्ष झाली तरी पुरस्काराचे वितरण झाले नाही याबाबत निर्मला गोगटे व डॉ. रेवा नातू यांना पुरस्कार देण्यास विलंब झाल्याबद्दल काहीही कळविले नाही..पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे कलाकारांना पुरस्कार प्रदान न करुन जेष्ठ कलावंताची महानगरपालिकेने थट्टाचं केली.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये