पुणे शहर

मनसेत मतभेद : वसंत मोरे हनुमान चालिसाला उपस्थित राहणार नाहीत?

पुणे : मनसेच्या (MNS) हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर मनसेत मतभेद असल्याचे समोर आले आहे. कार्यक्रम हा पक्षाचा नसून तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे, असा घरचा आहेर नगरसेवक वसंत मोरे यांनी दिला आहे. मला अद्याप कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असे स्पष्टीकरणही वसंत मोरे (Vasant More) यांनी दिले आहे.

संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरेंना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thakarey) भेटी दरम्यान मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असे ते म्हणाले आहेत. आपल्या प्रभागात भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. त्यानंतर शहरातील मनसेत असलेले मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता पुन्हा एकदा त्याची प्रचिती येत आहे.

Img 20220414 wa0001
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये