कोथरुड

अन्यथा तुमचं दुकान बंद करा.. पुणे मनपाच्या सुतार दवाखान्यात सुरू असलेल्या क्रस्ना डायग्नोस्टिकला मनसेचा इशारा.

ज्येष्ठ नागरिक मोफत टेस्ट व शहरी गरिब योजना मोफत सुरू करा ; मनसे आक्रमक

पुणे : महानगरपालिकेच्या जागेत नागरीकांच्या सेवेसाठी एवढया मोक्याच्या जागी पालिकेचा दवाखाना एका कोपऱ्यात टाकून दर्शनी भागात प्रशस्त जागेत पीपीपी तत्वावर क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर कोथरूड मधील सुतार दवाखाना सुरू करण्यात आले. फक्त दिखाव्यासाठी सुरुवातीचे काही दिवस शहरींगरीब योजना व जेष्ठ नागरिक मोफत सुविधा राबविल्या आणि त्या आता पूर्ण पणे बंद केल्या आहेत. त्यामुळे मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मोफत टेस्ट व शहरी गरिब योजना सुरू करा अन्यथा तुमचं दुकान बंद करा असा इशारा मनसेचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी मनपाच्या सुतार दवाखान्यात सुरू असलेल्या क्रस्ना डायग्नोस्टिकला सेंटरला दिला आहे.

धावडे म्हणाले, पीपीपी तत्वावर महापालिकेचा खजिनाच
क्रस्ना डायग्नोस्टिक ह्या खाजगी कंपनीला मनपा प्रशासनाने उघडा करून दिला आहे आणि ते नागरिकांची लूट करत आहेत. मग मनपा ने आमचा हक्काचा सरकारी दवाखाना ह्या खाजगी कंपनीच्या घशात का घातला असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे.

“शहरींगरीब योजना व जेष्ठ नागरिक मोफत तपासणी योजना” पुन्हा सुरू केल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या “मनसे स्टाईलने” आमच्या हक्काच्या सरकारी दवाखान्यातील हे खाजगी लुटारू दुकान कायमचं बंद करेल एवढे मात्र नक्की. या विषयावर पुणे मनपा आयुक्त व प्रमुख आरोग्य अधिकारी यांची लवकरच भेट घेऊन मनसे चर्चा करणार व दोन्ही योजना परत सुरू करण्याची मागणी करणार आहे यावर तोडगा निघाला नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा धावडे यांनी दिला आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

गेले काही दिवस मनसे कडे ह्या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या विषयावर आज क्रस्ना डायग्नोस्टिक, सुतार दवाखाना, कोथरूड ला मनसे शिष्ट मंडळाने भेट दिली व त्यांचे अधिकारी एम.डी. गोडांबे ह्यांना निवेदन दिले. यावेळी मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्यासह शाखा अध्यक्ष किरण उभे, विराज डाकवे, शुभम चोरगे, तन्मय मेमाणे, संतोष वाघमारे, हर्षद खाडे, संजय काळे, प्रशांत पायगुडे व राजेंद्र वेडेपाटील उपस्थित होते.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये