सद्गुरु गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे श्रीदत्त ध्यान मंदिराचा १७ वा वर्धापनदिन सोहळा आणि श्री गुरुपरंपरा मूर्ती, श्री सद्गुरु पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठया उत्साहात संपन्न

पुणे : पाषाण मधील सद्गुरु गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे श्रीदत्त ध्यान मंदिराचा १७ वा वर्धापनदिन सोहळा आणि श्री गुरुपरंपरा मूर्ती,श्री सद्गुरु पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठया उत्साहात पार पडला.

रविवार, दि. १४ मे २०२३ या शुभदिनी प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज आणि सद्गुरु श्री गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. तसेच सद्गुरु श्री.गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे महाराज (सर)
यांच्या चरण पादुकांची देखील स्थापना संपन्न झाली.



यावेळी मंदिराचे विश्वस्त माजी उपमहापौर दीपक माधवराव मानकर, वसुधा दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर, करण मानकर,मानकर परिवार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी सकाळी श्री गुरुपरंपरा मूर्ती आणि श्री सद्गुरु पादुका प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात येऊन आरती करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री नृसिंह आश्रम स्वामी महाराज
प.प. श्री नृसिंह आश्रम, प.प. श्री वामनानंद सरस्वती स्वामी महाराज(श्री दत्तात्रेय मठ, नारद घाट, श्री क्षेत्र वाराणसी),प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (श्री क्षेत्र बल्लाळेश्वर, पाली)
यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.












